आयोजकांसाठी
नोंदणीपासून बक्षिसांपर्यंत शर्यत तुमच्या टीमसोबत चालवा. मैदानावरचे सगळे शर्यत फोनवर पाहतात.

शर्यत भरवण्याचे टप्पे
आयोजक म्हणून अर्ज करा
मेनू → आयोजक उघडा. मंडळाचे नाव, शर्यतीचे मैदान आणि किती वर्षे शर्यत भरवता, ते लिहा. ॲडमिन प्रत्येक अर्ज तपासतात.
शर्यत तयार करा
तारीख, ठिकाण, शर्यतीचा प्रकार, फाट्या, प्रवेश फी आणि बक्षिसे भरा. मसुदा जतन करा आणि तयार झाल्यावर प्रकाशित करा.
परवानगी आणि पंच
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, किमान एक झेंडा पंच आणि एक निकाली पंच, हे असल्याशिवाय शर्यत प्रकाशित होत नाही. परवानगीचे पत्र फक्त तुमची टीम आणि ॲडमिन पाहतात. इतरांना “जिल्हाधिकारी परवानगी ✓” दिसते.
नोंदणी आणि प्रवेश फी
फी ॲपमध्ये Razorpay ने घ्या, किंवा मालकांना थेट तुम्हाला भरू द्या. तसे केल्यास त्या पैशांचा परतावाही तुम्हीच देता. प्रत्येक जोडीची नोंदणी आणि पेमेंट एका यादीत दिसते.
सुट्टी
एका बटणाने ॲप गट आणि फाट्या काढते. गट निघाले की सगळ्यांना लगेच फोनवर दिसतात.
रेषेवर तपासणी
प्रत्येक फेरीपूर्वी झेंडा पंच प्रत्येक फाटी तपासतात आणि जोडीची “तयार”, “गैरहजर” किंवा “परवानगी नाही” अशी नोंद करतात. जोडी आली नसेल तर ती फेरी थांबवा आणि नंतर पुन्हा बोलवा.
निकाल आणि हरकती
निकाली पंच निकाल नोंदवतात आणि तो लगेच अधिकृत होतो. त्या फेरीतील मालक 30 मिनिटांत हरकत घेऊ शकतात. बरोबरी आणि हरकती ॲपमध्येच सोडवा.
फायनल आणि बक्षिसे
फायनलनंतर प्रत्येक क्रमांकाचे बक्षीस विजेत्या जोडीच्या नावावर दिसते आणि मालकांना सूचना जाते.

सुट्टी सगळ्यांसमोर,निकाल खरा.

तुमची टीम, तुमचे पंच
झेंडा पंच, निकाली पंच आणि सह-आयोजक मोबाइल नंबरने जोडा. प्रत्येकाला फक्त त्याच्या कामाची बटणे दिसतात.
मैदानावर नेटवर्क कमी असले तरी
रेषेवरची तपासणी आणि निकाल आधी फोनवर जतन होतात. कनेक्शन परत आल्यावर ते आपोआप पाठवले जातात.