बैलगाडा शर्यत English

बैल मालकांसाठी

बैलाचे पान, जोडीची नोंदणी आणि शर्यतीचा दिवस, तुमच्या फोनवर आणि तुमच्या भाषेत.

शिंगे रंगवलेला, झूल आणि झेंडूच्या माळेने सजलेला खिल्लार बैल

गोठ्यापासून मैदानापर्यंत

  1. साइन इन करा

    तुमचा मोबाइल नंबर टाका, मग SMS ने आलेला 6 अंकी कोड.

  2. बैल जोडा

    नाव, फोटो, जात, दातांचा टप्पा आणि ओळख खूण. प्रत्येक बैलाचे स्वतःचे पान बनते.

  3. शर्यत शोधा

    तुमच्या भागातील शर्यती तारीख, ठिकाण, प्रवेश फी आणि बक्षिसांसह पाहा. तुमचा बैल कोणत्या शर्यतीसाठी पात्र आहे, हे ॲप दाखवते.

  4. जोडी नोंदवा

    तुमचे दोन बैल, किंवा तुमचा एक आणि जोडीदाराचा एक. जोडीदार मालकाला आमंत्रण जाते. त्यांनी ते स्वीकारले की नोंदणी पुढे जाते.

  5. प्रवेश फी भरा

    आयोजकाने ठरवल्याप्रमाणे ॲपमध्ये Razorpay ने किंवा थेट आयोजकाला. पूर्ण फी भरल्यावर नोंदणी निश्चित होते.

  6. सुट्टी आणि शर्यतीचा दिवस

    सुट्टीनंतर तुमचा गट आणि फाटी फोनवर दिसतात. गट पुढे आला की सूचना येते. रेषेवर तपासणीनंतर जोडी धावते.

  7. निकाल आणि हरकत

    निकाल लगेच अधिकृत होतो आणि सगळ्यांना दिसतो. तुमची जोडी ज्या फेरीत धावली, त्या फेरीच्या निकालावर 30 मिनिटांत हरकत घेता येते.

  8. बैलाची नोंद

    प्रत्येक शर्यत, फेरी आणि बक्षीस बैलाच्या पानावर जमा होते. बैल विकल्यावर ॲपमध्ये हस्तांतर करा. नोंद बैलासोबत जाते.

गोठ्यात मेहनत,मैदानात मान.

गुलाल उधळत विजयी बैलजोडीचा जल्लोष

सजलेली जोडी, सगळ्यांच्या फोनवर

गुलालात रंगलेला साज आणि आपल्या बैलाचा माज. रील्स आणि पोस्टमधून सर्वांना दाखवा.

तुमचा मोबाइल नंबर इतर लोकांना कधीच दिसत नाही. लोकांना तुमचे नाव, गाव आणि बैल दिसतात.

चषक, पदके आणि लाल वहीसह बैलाची मानाची नोंद

पैशांचे नियम आधीच स्पष्ट

प्रवेश फी कशी भरायची, हे आयोजक ठरवतात. निश्चित नोंदणीची फी परत मिळत नाही. शर्यत रद्द झाली तर भरलेली सर्व रक्कम परत मिळते. ॲपमध्ये भरलेली रक्कम ॲपकडून परत मिळते, आयोजकाला भरलेली रक्कम आयोजकाकडून.

परतावा आणि रद्द करण्याचे नियम वाचा